उद्घाटनाच्या आधीच मालवण एस. टी. स्टँडच्या दर्शनी भागाचे नुकसान

संतोष हिवाळेकर / मालवण

मालवण : बस स्थानकावरील जुनी वादग्रस्त इमारत जमीन दोस्त करण्याची कार्यवाही सुरू असताना जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळल्याने दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी सदरचे काम सुरू असताना एसटी महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा बस स्थानक परिसरात होती. मालवण बस स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही  गेले चार दिवस सुरू आहे. आज सकाळी यातील इमारतीचा अखेरचा काही भाग तोडण्याचे काम सुरू असताना त्या इमारतीचा तोडलेला भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळला आणि त्या ठिकाणी करण्यात आलेले छप्पर कोसळले. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी नवीन इमारतीचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!