वैद्यकीय व्यवसायात म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते – डॉ मार्गारेट लोबो.


“वैद्यकीय क्षेत्रांत म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते.मन प्रसन्न राहते.प्रसन्न मनाने केलेली रुग्णसेवा रुग्ण व डॉक्टर या दोघांनाही आत्मिक बळ देते”. असे उद्गार डॉ मार्गारेट लोबो यांनी काढले.त्या नेरूर येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत कै.यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व सशोधन केंद्र नेरूर येथे डॉ.मार्गारेट लोबो संगीत चिकित्सा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “फिजिओथेरपी व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक कामात म्युझिक थेरपी वापरण्याचे तंत्र आत्मसात करावे . या थेरपीच्या विकासाचे आद्यप्रवर्तक फक्त आपल्या जिल्ह्यातच नाही तर भारत देशात निर्माण व्हावे “असे विचारही मार्गारेट लोबो यांनी मांडले. तसेच त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये म्युझिक थेरपी मधील अनेक पैलू व कार्यपद्धती ,फिजिओथेरपी आणि व्हॉइस थेरपी यांच्या समन्वयातून एकत्रितरित्या कसा वापर होतो ,हे देखील सांगितले.


या कार्यक्रमाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ .स्मिता सुरवसे देखीलप्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी म्युझिक थेरपी या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी परिचयात्मक अभ्यासक्रम आखून विद्यार्थ्यांना सादर करावा ,असा विचार मांडला .अभ्यासक्रम राबविताना स्थानिक संगीत क्षेत्रातील कलाकार,अभंग गायक तसेच वादक यांना देखील समाविष्ट करावे . जेणेकरून त्यांच्यातील कला सर्व दूर पोहोचेल.असे त्यांनी नमूद केले.


बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे ‘डॉक्टर मार्गरेट लोबो संगीत चिकित्सा केंद्राचा’ उद्घाटन सोहळा दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाला.


डॉक्टर मार्गरेट लोबो यांच्या इंग्लंड, नेपाळ आणि भारतातील अविरत कार्याला वंदन आणि कृतज्ञतेच्या भावनेतून या संगीत चिकित्सा केंद्राची स्थापना करण्यात आली. संगीतामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात तसेच आव्हानात्मक परिस्थितीत ,आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याची व पुढील वाटचालीस दिशा देण्याची शक्ती आहे .
संगीत हा शब्द येथे व्यापक अर्थाने वापरला जातो, उदाहरणार्थ गायन आणि वादन, नृत्य आणि लयबद्ध हालचाल, रंगकर्म आणि चित्रकला या विविध कलांच्या अविष्कारातून मिळणाऱ्या सर्वसाधारण फायद्यांच्या पलीकडे जाऊन, आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा विविध कलांचा उपचारात्मक पद्धतीने उपयोग आत्मबल वाढविण्यासाठी व जीवन निरामय करण्यासाठी केला जातो. आणि यात संगीत कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे . या कार्यक्रमाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे या केंद्राचे उद्घाटन स्वतः डॉक्टर मार्गारेट लोबो यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग प्राचार्या सौ. कल्पना भंडारी, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजचे प्रा. डॉ. सुरज शुक्ला तसेच श्री प्रवीण शेवडे विविध अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, डॉ.आदी मान्यवर उपस्थित होते.


या संगीत चिकित्सा केंद्राच्या उद्घाटनाला बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उमेश गाळवणकर यांनी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार फिजिओ थेरपी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रणित धनावडे यांनी केले.

error: Content is protected !!