मालवणी भाषा दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचे खास मालवणीतून ट्विट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आज मालवणी भाषा दिनानिमित्त त्यांनी मालवणीतून केलेलं ट्विट जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरलं आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “कालच्या ३ तारखेक जो अवकाळी पाऊस कोसळलो तेना माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बराच नुकसान केल्यान. काही ठिकाणी हाता तोंडाक इलेलो आंबो आणि काजू निसर्गाच्या लहरीपणान मातीमोल झालो. निसर्ग लहरीपणान वागत असलो तरी ह्या सरकार आणि पालकमंत्री म्हणून मी जिल्हावासियांच्या पाठीशी नेहमी रवतलव”

खरंतर नारायण राणे आणि कोकण यांचं एक अविभाज्य असं नातं आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नारायण राणेंचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. आज पालकमंत्री नितेश राणे व आ. निलेश राणे यांच्यामध्ये खा. नारायण राणे यांचेच प्रतिबिंब पाहायला मिळते.

आज खरंतर मालवणी भाषा दिन, आपण अनेकदा जिल्ह्याच्या बाहेर असलो की लोक काय म्हणतील ? या विचाराने मालवणी बोलायला कचरतो. परंतु, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी आज मालवणी भाषा दिनानिमित्त जनतेशी खास मालवणी भाषेतून संवाद साधला आहे. ते सुद्धा ट्विटर सारख्या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. असं करून त्यांनी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला असून यामुळे कोकणी माणूस व मालवणी भाषेशी असणारं त्यांचं नातं अधिकच दृढ झालं आहे.

राणे कुटुंब नेहमीच कोकणी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. “निसर्ग लहरीपणे वागत असला तरी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या पाठीशी नेहमी उभा आहे” हे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. ते सुद्धा आपल्या मालवणी बोलीभाषेतून. यामुळे ‘अस्सल कोकणी मातीचा मंत्री ‘ म्हणून नितेश राणे यांचं नाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1908121906558980277?t=VGMZRLnRaqIDoS1-d14lqw&s=08

error: Content is protected !!