लवकरात लवकर पाठपुरावा करून स्मारक उभारले जाईल; आ. निलेश राणेंनी दिला शब्द
कुडाळ : कुडाळ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींच्या मनात होती. ही गोष्ट आज तमाम शिवप्रेमींनी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातली.
कुडाळ पोलीस स्टेशनच्या शेजारी सकल हिंदू समाजाकडून नामकरण करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी समस्त शिवप्रेमींनी आमदार निलेश राणे यांना निवेदन दिले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करेन. अन्यथा स्वखर्चाने या ठिकाणी स्मारक उभे करून देईन असा शब्द दिला. यावेळी यावेळी रमाकांत नाईक,विवेक पंडित, सुविनय दामले, बबन घुर्ये,काशिनाथ निकम, समीर सराफदार, राम सावंत, चंद्रशेखर पाटील, देवेश रेडकर, नचिकेत देसाई, धीरज पांचाळ,शुभम देसाई, प्रख्यात काणेकर, महेश गंगावणे, ओंकार मंडलोकर, उदय आईर, घनश्याम परब,मनोज वालावलकर, संतोष परब,प्राजक्ता शिलवलकर, संध्या तेरसे,मृणाल देसाई, अंजली वालावलकर , मावळा ग्रुप आणि इतर उपस्थित होते.













