
युवासेनेचा संवेदनशील उपक्रम!
कुडाळ : पोलीस स्टेशन ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला भगिनींना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आज युवासेना कुडाळच्या माध्यमातून मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम माननीय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. छत्री मिळाल्यामुळे भाजी विक्रेत्या महिला भगिनींनी समाधान व्यक्त करत माननीय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सरूप वाळके, युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर व अनिकेत तेंडोलकर,उपतालुका प्रमुख विश्वास पांगुळ, अवधूत सामंत, प्रसाद मठकर, विनोद सावंत, समीर परब, सद्गुरू घावनळकर, कुमार राठोड तसेच युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला भगिनींच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देणे, हीच युवासेनेची सामाजिक बांधिलकी!



Subscribe










