अखेर कुडाळ – विजापूर बसफेरी सुरू होणार

दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वाजता कुडाळ बस स्थानकातून बस सुटणार

नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचे विशेष प्रयत्न

कुडाळ : कुडाळ आगारातून सुरू असलेली कुडाळ – विजापूर बसफेरी अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. याबाबत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधल्यानंतर ही बसफेरी सुरू करण्यात आली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत कुडाळ आगारातून नियमित सुरू असलेली कुडाळ – विजापूर बसफेरी अचानक बंद करण्यात आली होती. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या सणासाठी कुडाळ येथून आपल्या विजापूर येथील गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. याबाबत शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे व उपशहरप्रमुख प्रथमेश केळबाईकर यांनी प्रवाशांसह आगार व्यवस्थापकांची भेट घेत याकडे लक्ष वेधले होते. यावेळी शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी गणेश चतुर्थीपूर्वी किमान १२ व १३ सप्टेंबर रोजी ही बसफेरी सुरू करावी अशी विनंती केली होती. या मागणीला अखेर यश आले असून १२ व १३ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वाजता कुडाळ बस स्थानकातून ही बस सुटणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात असून सर्वांनी शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे व उपशहरप्रमुख प्रथमेश केळबाईकर यांचे आभार मानले.

error: Content is protected !!