रोहन सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून नाग्या महादू निवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

कुडाळ : रोहन सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून गुरुवारी १० सप्टेंबर रोजी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वस्तीगृहामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. रोहन सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. आजच्या उपक्रमामुळे रोहन सामंत फाउंडेशनचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!