वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्यावर केलेली कारवाई सूड भावनेतून

अशा कठीण प्रसंगात समाजबांधवांनी सिद्धेश परब यांच्या पाठीशी राहावे

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांचे आवाहन

कुडाळ : वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्यावर अमली पदार्थ सापडल्याच्या आरोपाखाली वेंगुर्ला पोलिसांनी आज कारवाई केली. ही कारवाई सूड भावनेतून केली असून मराठा समाज बांधवांनी आशा कठीण प्रसंगात सिद्धेश परब व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केले. सिद्धेश परब मागील १० वर्षांपासून मराठा चळवळीशी जोडलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधव त्यांना ओळखून आहे. समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ फार मोठी आहे. अशी व्यक्ती समाजासाठी घातक असणारे अमली पदार्थ कदापि बाळगणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, अलीकडेच त्यांनी सामाजिक जाणीवेतून मायनींग विरोधात लढा सुरु केला होता. त्यातून त्यांना हरएक प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न हितशत्रुंनी केला होता. आजची प्रशासकीय परिस्थिती पाहता प्रशासन हे धनाढ्य लोकांची बटिक झालेली आहे. खास करून अलीकडच्या काळात पोलीस बंदोबस्तात अनेक लोकांच्या मिळकती बळकावण्याचे सुध्दा प्रकार घडलेले आहेत. त्याचाच परीणाम म्हणून आजची कारवाई सुडभावनेतून करण्यात आलेली आहे. मायनिंग हस्तकांच्या इशाऱ्यावर अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे असे म्हणत त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने या कारवाईचा निषेध केला. तसेच जिल्ह्यातील मराठा बांधवांनी सिद्धेश परब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!