झाराप येथे अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण प्रस्तुत ‘कुर्मदासाची वारी’

युवा उद्योजक श्री. महेश नारकर यांचे आयोजन

कुडाळ : रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सायं. ७ वाजता भावई मंदिर झाराप येथे अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ यांचा प्रबोधनयुक्त, हृदयस्पर्शी, विठ्ठलभक्तीवर आधारित नाट्यप्रयोग ‘कुर्मदासाची वारी’ सादर केला जाणार आहे.

या नाटकाचा हा ३४८ वा प्रयोग असून नाटकामध्ये लुळ्या पांगळ्या जीवाचा भक्तिमय प्रवास दाखवला जाणार आहे. तेव्हा नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दशावतार नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाटकाचे आयोजक श्री. महेश नारकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!