आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वेताळबांबर्डे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेकडून विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा.

कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेच्या वतीने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी प्रसाद गावडे, अवधूत सामंत, अमोल गोवेकर, भूषण बांबर्डेकर,निलेश बांबर्डेकर, सारिका कदम, सलोनी आंगणे, संध्या घाडी, बाबल बांबर्डेकर,विजय गावडे,संतोष सामंत आदी पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रसाद गावडेंनी विद्यार्थ्यांना येत्या शालांत परीक्षांसाठी शुभेच्छा देत एप्रिल व मे हा सुट्ट्यांचा कालावधीत वाढत्या उष्मा घाताच्या पार्श्वभूमीवर दुपारी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडता आपल्या पालकांना देखील दुपारच्या वेळेत शेतातील कामे टाळण्यासाठी आग्रह धरून सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले. शिक्षक वर्गाने कार्यकर्त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!