वैभववाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज देखील वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेचे युवा नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील धुरी यांनी देखील पक्षाची साथ सोडल्यामुळे ठाकरे सेनेला फार मोठा धक्का मानला जात आहे.
स्वप्नील धुरी हे गेली १० वर्षांपासून शिवसेनेमध्ये सक्रियरित्या कार्यरत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाला आलेली मरगळ झटकण्यास वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या सगळ्याबद्दल वेळोवेळी चर्चा करून देखील वरिष्ठ पातळीवरून कोणतीही दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जात नाही. या नैराश्यातून पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
त्यांच्या या राजीनाम्यामुळे ठाकरे सेनेचे फार मोठे नुकसान झाले आहे.