ब्युरो न्यूज: उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा ओघ पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
कधी आणि कुठली स्पेशल गाडी?
कोकण रेल्वे मार्गावरुन उधान जंक्शन ते मंगळुरु जंक्शन ही स्पेशल गाडी येत्या रविवारीपासून (9 मार्च) 30 जूनपर्यंत धावणार आहे. ही स्पेशल गाडी द्विसाप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस (बुधवारी आणि रविवारी) धावणार आहे. या स्पेशल गाडीचा प्रवास उधान जंक्शन येथून रात्री 8 वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.45 मिनिटांनी मंगळुरु जंक्शन येथे संपेल. तर परतीच्या प्रवासासाठी मंगळुरुहून ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी उधान जंक्शनसाठी निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी उधानला पोहोचले.
स्पेशल गाडी कुठे थांबणार?
उधना जंक्शन- वलसाड- वापी- पालघर- वसई रोड- भिवंडी रोड- पनवेल- पेन- रोहा- माणगाव- खेड- चिपळूण- सावर्डा- संगमेश्वर- रत्नागिरी- राजापूर रोड- वैभववाडी रोड- कणकवली- सिंधुदुर्ग- कुडाळ- सावंतवाडी रोड- थिविम- करमाळी- मडगाव जंक्शन- काणकोण- कारवार- अंकोला- गोकर्ण रोड- कुम्ता- मुरूडेश्वर- भटकळ- मुकाम्बिका रोड- कुन्दपुरा- उडुपी- मुल्की- सुरथकल- थोकुर- मंगळुरु जंक्शन













