मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी खुशखबर
सिंधुदुर्ग : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक ८, ९ व १० मार्च २०२५ रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही खुशखबर असून या एक्सपोच्या माध्यमातून बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या आणि सिंधु विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठा उद्योजक डिरेक्टरी’ या उपक्रमा अंतर्गत २०२२ मध्ये कुडाळ येथे व्हेईकल एक्सपो घेतला होता. या यशस्वी प्रयोगानंतर ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद आणि मागणीमुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा कमर्शियल व्हेईकल एक्सपो-२०२५ दि. ८, ९ व १० मार्च २०२५ या कालावधीत सावंतवाडी येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज प्रतिपुर्ती योजना लागू केलेली आहे. सदर योजनेच्या धर्तीवर ओबीसी वर्गाकरीता महाराष्ट्र शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून व्याज प्रतिपुर्ती लाभार्थ्यांना दिली जाते. सदर दोन्ही योजनांमधून कर्जावरील व्याज हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते. परंतू सदर दोन्ही योजनांची शासनाच्या पातळीवर म्हणावी तशी प्रसिध्दी झालेली नाही. त्यामुळे बरेच व्यावसायीक वाहन खरेदीदार हे या दोन्ही योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १५,००० परमीटधारक रिक्षा व १०००० पेक्षा जास्त मालवाहतूक करणारी वाहने आहेत. त्याचप्रमाणे खाजगीरीत्या पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या खूप आहे. मराठा महांसघामार्फत लोकांना व्यवसायाकरीता प्रेरीत करणे व त्यांना प्रोत्साहन देणे याकरीता अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्हयातील व्यावसायिक वाहनधारक व भविष्यात या व्यवसायात पदार्पण करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकरीता कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२४ आयोजन करण्याचे ठरविलेले आहे. सदर कार्यक्रम हा सिंधुदुर्ग अॅटो रिक्क्षा चालक मालक संघटना व महाराष्ट्र राज्य ट्रक-टेंपो-ट्रॅक्टर-बस वाहतुक महासंघ, मुंबई वा संघटनांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा तीन दिवसांचा घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला जिल्हाभरातून कमीत कमी सुमारे २५००० व्यावसायीक वाहन धारक उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांचा डेटा महासंघामार्फत ठेवण्यात येणार आहे. सदरचा डेटा हा सहभागी शोरुमना देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची जाहीरात सोशल मिडीया (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटस अॅप) माध्यमातून तसेच जाहीरात फलक यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहन धारकांच्या प्रत्यक्ष भेटी व मिटींगव्दारे प्रसिध्दी करण्यात येणार आहे. कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ अशाप्रकारचा कार्यक्रम हा तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. सदरचा कार्यक्रम हा विशिष्ट वर्गाकरीता असल्यामुळे ज्या व्यक्तींना व्यावसायीक वाहने घेण्यामध्ये रुची आहे. अशा व्यक्तीचा सहभाग कार्यक्रमात राहणारा आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी शो रूम धारकांना त्यांच्या वाहनांचा डिस्प्ले करण्यासाठी प्रशस्त जागा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सदरच्या कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ मध्ये वित्तीय संस्थांचा सुध्दा सहभाग राहणारा आहे. सोबतच्या नकाशाप्रमाणे कमर्शियल व्हेईकल एक्सपो – २०२५ कार्यक्रमाचा ले – आऊट आणि संस्थेच्या बँक खात्याचा तपशील आहे. सदर कार्यक्रमातील सहभाग हा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर देण्यात येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त मराठा व ओबीसी तरुणांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













