कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग जिल्हयातुन हददपार.

सिंधुदुर्ग : जिल्हयातील नागरीकांचे जिवीतास व मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी पोलीस ठाण्याचे हददीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश दिलेले होते.

त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदुम, कुडाळ पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याचे हददीत शरीराविरुदध (दुखापत, खुनाचा प्रयत्न) तसेच मालमत्ते विरुदध (चोरी, घरफोडी ) गुन्हे करणारे सक्रिय गुन्हेगारांची माहिती संकलीत केली व त्यानुसार काही सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याकरीता अहवाल मा. उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांना मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचेमार्फत पाठविण्यात आले होते.
त्यानुसार सराईत गुन्हेगार (1) हादी अब्दुल बारी खान, वय 42 वर्षे, रा. कुडाळ रेल्वे स्टेशन जवळ ता कुडाळ (2) नदीम अब्दुल रहीमान शेख, वय 24 वर्षे रा. वेताळ बांबर्डे, ता कुडाळ सद्या रा पिंगुळी ता कुडाळ यांच्या हददपारीच्या प्रकरणाची सुनावनी मा. उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांनी घेवुन त्यात वरील नमुद दोन सराईत गुन्हेगार यांना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग जिल्हयातुन हददपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. वरील दोन्ही गुन्हेगार हे सद्या त्यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयात न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी येथील कारागृहामध्ये आहेत. ते न्यायालयीन कोठडीतुन बाहेर येताच त्यांना सदर हददपारीचे आदेशाची त्वरीत बजावणी करुन त्यांना सिंधुदुर्ग जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हददपार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

भविष्यातही सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन अशा गुन्हेगारांना सिंधुदुर्ग जिल्हयातुन हददपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही संपूर्ण जिल्हयात सुरु आहे.

सदरची कारवाई मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, मा. श्री. कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व मा. श्री. विनोद कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार, प्रितम कदम, कृष्णा केसरकर, संजय कदम, रुपेश सारंग, उषा आईर यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!