कलमठ गावचा सुपुत्र चि.अवधूत घुगरे याचे सी.ए. मध्ये उत्तुंग यश.

चि. अवधूत सुप्रिया सुनिल घुगरे राहणार महाजनी नगर कलमठ तालुका कणकवली याचे सी.ए. फायनल मध्ये उत्तम गुणांनी घवघवीत यश मिळविले आहे.

माझे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण एस एम हायस्कूल कणकवली येथे झाले. दहावीची परीक्षा 97% टक्क्यांनी पास होऊन प्रशालेत प्रथम आलो.

इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण मी पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पूर्ण केले. इयत्ता बारावीचे परीक्षा सुद्धा 97 टक्क्यांनी पास झालो.

त्यानंतर मी सीए च्या क्षेत्रात पाऊल टाकले.
सीए फाउंडेशन व सीए इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा नोव्हेंबर 2021 व 2022 या वर्षात अनुक्रमे पास झालो.

माझ्या तीन वर्षाची आर्टिकलशिप पुण्यातील नामवंत डी. आर. बर्वे अँड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट, कोथरूड पुणे येथे केली.

सीए करत असतानाच मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बीकॉम ची पदवी घेतली. त्यानंतर सीए फायनल चे दोन्ही ग्रुप मे 2026 मध्ये देऊन वयाच्या 22 व्या वर्षी घवघवीत यश प्राप्त केले.

इयत्ता आठवी मध्येच मी चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा निर्णय घेतला होता.

या यशामध्ये माझे आई-वडील, बहिणी,माझे गुरुवर्य तसेच सीए डी. आर. बर्वे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हे सर्व श्रेय मी कुलदेवतेच्या चरणी अर्पण करतो.

error: Content is protected !!