ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या विविध समित्या जाहीर

:राज्य प्रसिद्धी सचिवपदी सिंधुदुर्गाचे दत्तात्रय मारकड यांची निवड

तळेरे – प्रतिनिधी

अॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) संलग्न असलेल्या ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रची सर्वसाधारण सभा नुकतीच
साई चेंबर्स, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडली या सभेत एकेएफ्एम च्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्य असून वर्षभरातील विविध स्पर्धांचे नियोजन जाहीर करण्यात आल्या असून संघटनेच्या राज्य प्रसिद्धी सचिव म्हणून कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांची निवड करण्यात आली आहे.
या सभेचे अध्यक्षस्थानी पुनीत बालन, चेअरमन सपना वाघमोडे, उपाध्यक्ष आमदार विवेक कोल्हे, विजय संतान, कल्याणकुमार गुजराथी, सचिव भारती जगताप, खजिनदार बाळासाहेब जाधव, सहसचिव ज्ञानेश काळे, गोकुळ तांदळे, अजय देशमुख, राजकुमार राऊत, सदस्य जगजीत खुराणा, अशोक देवकर, श्रीकांत पराडकर तसेच 24 जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2026 -27 या वर्षभरात पार पडणाऱ्या विविध गटांच्या स्पर्धांचे आयोजन व नियोजनाविषयी सखोल चर्चा करण्यात आली तसेच पंच व प्रशिक्षकांच्या कार्यशाळा, खेळाडूंसाठी सराव शिबिरे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, कबड्डी लीगचे आयोजन व नियोजन, कबड्डी खेळात अन्याय विरोधी, भीतीमुक्त, निपक्षपातीपणे व उत्कृष्ट दर्जाचे प्रामाणिक कार्य होण्यासाठी विविध समित्यांची निवड करण्यात आली.

एकेएफ्एम विविध समित्या जाहीर..
शिस्तपालन समिती
विजय संतान -चेअरमन (नांदेड)
ज्ञानेश काळे -सचिव (सातारा)
गोकुळ तांदळे -सदस्य (छत्रपती संभाजीनगर)
बाळासाहेब जाधव -सदस्य (नाशिक)

तांत्रिक समिती
ज्ञानेश काळे -चेअरमन (सातारा)
अशोक देवकर -सचिव (पुणे)
अशोक सरोदे -सदस्य (ठाणे)
कलीम शेख -सदस्य(नाशिक)
योगेश वाघ -सदस्य (धुळे)
पंचमंडळ समिती
गोकुळ तांदळे -चेअरमन (छत्रपती संभाजीनगर)
संभाजी काळे -सचिव (पुणे)
राजेंद्र बनसोडे -सदस्य (कोल्हापूर)
गणेश म्हस्के -सदस्य (रायगड)
सुधा ढवळे -सदस्य (पुणे)

निवड समिती
सुनील जाधव -चेअरमन (पुरुष गट) अहिल्यानगर
सुधा ढवळे -चेअरमन (महिला गट) पुणे

छाननी समिती
अजय देशमुख -चेअरमन (जळगाव)
किरण गुंजाळ -सचिव (नाशिक)
विशाल खंदारे -सदस्य (जालना)

क्रीडांगण समिती
दादा देशमुख -चेअरमन (नाशिक)
फिरोज पठाण -सचिव (हिंगोली)
अभिजीत तांदळे -सदस्य (बीड)

प्रसिद्धी समिती
रामा रणदिवे -चेअरमन (पुणे)
दत्तात्रय मारकड -सचिव (सिंधुदुर्ग)
फिरोज मुलानी -सदस्य (सांगली)
विजय मोरे -सदस्य (नाशिक)

विभागीय पदाधिकारी
मुंबई विभाग –
अध्यक्ष- अशोक सरोदे (ठाणे)
सचिव- संजय धुमाळ (मुंबई)
पुणे विभाग-
अध्यक्ष- डॉ. बी. पी. रोंगे (सोलापूर)
सचिव- सुनील जाधव (अहिल्यानगर), नाशिक विभाग-
अध्यक्ष- आ. मंगेश चव्हाण (जळगाव)
सचिव- योगेश वाघ (धुळे) ,
कोल्हापूर विभाग
अध्यक्ष- दत्तात्रय घुगरे (कोल्हापूर)
सचिव- संतोष साळुंखे (सांगली)
छत्रपती संभाजीनगर विभाग,
अध्यक्ष- प्रा. सुरेशराव नवले (बीड)
सचिव- प्रा. गणपत पवार (छत्रपती संभाजीनगर),
लातूर विभाग
अध्यक्ष- प्रवीण पाटील (नांदेड)
सचिव- अशोक बनसोडे (धाराशिव)
यांची नियुक्ती करण्यात आली.
येणाऱ्या पुढील सर्व स्पर्धांसाठी व कबड्डी खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व समिती पदाधिकारी व सदस्यांचा तसेच सर्व जिल्ह्यातील उपस्थित अध्यक्ष, सचिव, जिल्हा प्रतिनिधी यांना पुनीत बालन यांनी ऑफिशियल किट देऊन पुढील नव्या कबड्डी पर्वासाठी”
सर्वांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!