आ. निलेश राणे बनले त्याच्यासाठी देवदूत

चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण

मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि चुटकीसरशी त्याचा प्रश्न सोडवला.

अभिषेक नलावडे हा एक उत्तम कबड्डीपटू असून काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना त्याचा हात खांद्यातून निखळला होता. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. परंतु ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर फक्त लीलावती रुग्णालयात उपलब्ध होते. त्यामुळे या शस्त्रक्रियेचा खर्च देखील फार मोठा होता. आता आपल्याला यापुढे कबड्डी खेळता येईल की नाही ? या गोष्टीचा विचार करून अभिषेक पुरता हताश झाला होता. अखेर ही बाब त्याने आ. निलेश राणे यांचे सहकारी संकेत बावकर व महेश पावसकर यांच्या कानावर घातली.

आ. निलेश राणेंना ही गोष्ट समजताच त्यांनी स्वतःहून अभिषकशी मोबाईलवरून संपर्क साधला. “अभिषेक तु काहीही काळजी करू नकोस, तुझी कबड्डी खेळण्याची इच्छा मी पूर्ण करणार” असे म्हणत त्याला दिलासा दिला. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या माध्यमातून लीलावती रुग्णालयात अभिषेकची मोफत शस्त्रक्रिया करून दिली. अभिषेक आज पूर्णपणे ठणठणीत असून आ. निलेश राणे हे आपल्यासाठी देवदूत असल्याचे त्याने म्हटले आहे.

कोकणी किंवा मराठी माणूस संकटात असल्यावर त्याचे एकमेव आशास्थान म्हणजे राणे कुटुंब… आजवर हे अनेकवेळा सिद्ध झाले असून राणेंच्या याच स्वभावामुळे कोकणचे भाग्यविधाते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे.

error: Content is protected !!