आंगणेवाडीला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या

कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

गाड्यांचे आरक्षण कधीपासून? कुठे असणार थांबे? जाणून घ्या

सावंतवाडी : कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीचा भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या जत्रेला आई भराडी देवीचे भक्त तर येतातच मात्र खास जत्रा पाहण्यासाठी देखील पर्यटकांची मांदियाळी असते. आई भराडीच्या जात्रे निमित्त कोकणवासीयांच्या सुविधेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान २२ डब्यांच्या दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे.या विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारी. ९ फेब्रुवारीपासून खुले होणार आहे. रेल्वे स्थानकावरील प्रवासी आरक्षण प्रणाली आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून प्रवाशांना आरक्षण करता येईल.

कुठली गाडी कधी सुटणार?

गाडी क्र. ०११२९/०११३०ही गाडी एलटीटी येथून २१ फेब्रुवारीला रात्री १२.५५ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून २१ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१०ला एलटीटीला पोहोचेल.

गाडी क्र. ०११३१/०११३२ही गाडी एलटीटी येथून २२ फेब्रुवारीला रात्री १२.५५ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी स. ६.१० वाजता एलटीटी येथे संपेल.

थांबे :

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली,

सिंधुदुर्ग आणि कुडाळ.डब्यांची संरचना : सेकंड एसी – एक, थर्ड एसी – सहा, स्लीपर – नऊ, जनरल – चार, जनरेटर – एक आणि एसएलआर – एक.

error: Content is protected !!