पर्यटक मारहाण प्रकरणी तिघांना अटक…

एका अप्ल्पवयीन संशयितास उद्या बाल न्यायालयात हजर करणार…

दोन महिलांना नोटीस

कुडाळ : गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पुण्याच्या पर्यटकांना झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला न्यायालयीन कोठडी दिली असून दोंघांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आसल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

झाराप तिठा येथे गुरुवारी सकाळी पुण्याहून गोव्याला जाणारे पर्यटक चहा साठी थांबले होते. त्यांच्या चहात माशी पडल्याचे निमित्त झाले आणि ते विचारणाऱ्या पर्यटकाला सहा जणांनी मिळून मारहाण केली. दोरीने बांधून ठेवले. कोणीतरी 112 क्रमांकावर पोलिसांना फोन केला. पोलीस आलयावर त्या पर्यटकांची सुटका झाली. त्या प्रकरणी तनवीर करामत शेख (वय 29), शराफत अब्बास शेख (वय-57), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय-18), श्रीम. परवीन शराफत शेख (वय-42), श्रीम. साजमीन शराफत शेख (वय -19) आणि तलाह करामत शेख (वय-26) (सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता-कुडाळ) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम -115(2),189(2),126(2), 191 (2) 190, 118 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तनवीर करामत शेख (29) याला गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज शराफत अब्बास शेख (57) आणि तलाह करामत शेख (26) याना अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर श्रीम. परवीन शराफत शेख (वय-42), श्रीम. साजमीन शराफत शेख (वय 19) यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. अब्बास उर्फ साहिल शराफत शेख हा अल्पवयीन असल्याने त्याला उद्या बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

error: Content is protected !!