कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी येथे पहाटे ६.०० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. गोव्याच्या दिशेने माशांची वाहतूक करणारा टेम्पो पावशी – सीमावाडी येथे आला असता चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडरवर आदळून पलटी झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती हाती आली आहे.