कुडाळ : पिंगुळीमध्ये संजना कलेक्शन दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून चोरी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील संजना कलेक्शनच्या मालक आरती परब रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आल्या असता आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली असता पोलीस तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर करत आहे.