खासदार नारायणराव राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश.
कुडाळ : तेंडोली येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, रामा राऊळ आदी उपस्थित होते.
विकासाच्या दृष्टीकोनातून आपण महायुती मध्ये सहभागी होत असून शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी प्रवेशकर्ते प्रसाद राऊळ, भावेश राऊळ, सागर धारपवार, दिनेश सावंत, वैभव राऊळ, गुरुनाथ राऊळ, गणेश राऊळ, आपा परब, विवेक राऊळ, ओंकार सावंत, गोरक्षनाथ राऊळ, विकास राऊळ, अंकुश राऊळ आदी उपस्थित होते.