ब्युरो न्यूज: अवकाळी पावसाने कोकणातील शेतकरी बागायतदार हे हवालदिल झाले आहेत. सोन्यासारखे आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.मात्र असं असून देखील यंदाचा हापूसचा आंबा,आंबा खवय्यांसाठी रवाना झाला आहे .दरवर्षी उन्हाळ्यात खायला मिळणार हापूसच्या आंब्याचा आस्वाद आंबा प्रेमींना यंदा मात्र गुलाबी थंडीत चाखायला मिळणार आहे.
योग्य काळजी घेऊन हे फळ पीक लवकर पिकवण्याचा मान सलग चौथ्यांदा मालवण कुंभारमठ येथील सुप्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ.उत्तम फोंडेकर यांना मिळाला आहे.दरम्यान यंदाच्या हंगामातील पहिलीच देवगड हापूस आंब्याची पेटी थेट नाशिक मधील ग्राहकांपर्यंत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पोहचवली असून या पेटीला २५ हजाराचा विक्रमी भाव मिळाला आहे.