दत्ता सामंत ॲक्शन मोडवर!

खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत तेंडोली पाठोपाठ आता बांदिवडे मधील उबाठा सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण प्रतिनिधी: शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या विषयीची चर्चेत असलेली टॅग लाईन दत्ता तिथे सत्ता ही विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडमध्ये आले आहे. रविवारी सायंकाळी तेंडोली गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर आता पाठोपाठ मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे उबाठा सरपंच तथा ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर यांसह माजी सदस्य लीलाधर मुणगेकर, युवासेनेचे विकास आचरेकर या सर्वांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यंदाचा हापूस आंबा मालवण मधून रवाना

माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावातील विकासकामांना प्राधान्य मिळण्यासाठी, यांच्या माध्यमातून अधिक गतीने गावचा विकास होणार असल्याच्या विश्वासातून शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे सरपंच आशु मयेकर यांनी सांगितले.

यावेळी खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख महेश राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, बाबू परब, सचिन पाटकर, मंदार लुडबे, महेश पेडणेकर, ओंकार पेडणेकर, भाऊ मोरजे, राहुल परब यांसह अन्य उपस्थित होते.

error: Content is protected !!