हा विजय खासदार नारायण राणेंच्या चरणी समर्पित करतो
भाजप पक्षाने मला निष्ठेचे फळ दिले आहे.ते फळच खुप गोड आहे
कणकवली : कळसुली पंचायत समिती मतदार संघातून मला मिळालेला विजय हा माझा एकटयाचा विजय नसून माझ्या कळसुली मतदार संघातील मतदारांचा, जनतेचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांचे हे यश आहे.भाजपचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे.पक्षाने मला निष्ठेचे फळ दिले आहे.ते फळच खुप गोड आहे.त्यामुळे माझ्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी यापुढेही ही प्रामाणिकपणे आणि निश्चितचपणे पार पाडेन.अशी ग्वाही दिली. मला मिळालेल्या या संधीचे सोने करणार आहे.माझा हा विजय खासदार नारायण राणे साहेबांच्या चरणी समर्पित करतो.असे प्रतिक्रिया कळसुली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी व्यक्त केली.
ते विजयी झाल्यावर माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.यावेळी भारतीय जनता पार्टी च्या कळसुली जिल्हा परिषद मतदार संघाच्या नवनिर्वाचित सदस्या सौ.शितल दळवी, ओसरगाव पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्या सौ.अक्षता राणे, भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष शशिकांत राणे,हळवल माजी सरपंच संतोष गुरव,कळसुली सरपंच सचिन पारधीये, कळसुली माजी सरपंच अतुल दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक समीर सावंत, प्रवीण दळवी,दिपक मेस्त्री, प्रशांत गावडे, अमित दळवी,राजू नार्वेकर,वागदे गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडी, स्वप्नील गोसावी, विश्वनाथ लाड आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लक्ष्मण गावडे म्हणाले की,मी भारतीय जनता पार्टी चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी मला निष्ठेचे फळ दिले आहे.यापुढे त्यांच्या मार्गदर्शाखाली कळसुली पंचायत समिती मतदार संघाचा विकास साधणार आहे.
मला कळसुली पंचायत समिती मतदार संघातून 2533 मते मिळाली असून 1191 मताधिक्यांनी मी लिड घेऊन विजयी झालो आहे.जनतेने एकतर्फी विजय दिल्यामुळे मी खुश आहे.यापुर्वी हळवल उपसरपंच म्हणून मी चांगले काम केले आहे.कळसुली पंचायत समिती मतदार संघात घरोघरी भेटी देत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.यापुढे मतदार संघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.असे गावडे यांनी सांगितले.यावेळी कार्यकर्त्यांनी लक्ष्मण गावडे तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है.भारतीय जनता पार्टी चा विजय असो.अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला.तसेच कळसुली पंचायत समिती मतदार संघात रॅली काढण्यात आली.यावेळी भाजपचे पंचक्रोशीतील कार्यकर्ते, पदाधिकारी रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत,ढोल ताशांच्या गजरात, घोषणा देत, गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.यावेळी मतदारांचे आणि जनतेचे आशीर्वाद घेत , ग्रामदेवतचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले.लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी जनतेचे आभार मानले.



Subscribe









