देवगड येथून २ वर्षीय बालिकाचे अपहरण

पोलिसांकडून शोध सुरू

देवगड : देवगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीने २ वर्षांच्या बालिकेला तिच्या आईच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवगड पोलिसांनी आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.

​ओमकार सुनील बाणे (वय २८) असे आरोपीचे नाव असून त्याने (वय २ वर्षे) या मुलीला फिर्यादीच्या संमतीशिवाय पळवून नेले आहे. या संदर्भात देवगड पोलीस ठाण्यात गु. र. नं. २०७/२०२५, बीएनएस कलम १३७/२, ११५/२, ३/५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार,  संशयित आरोपी ओमकार बाणे हा नांदीवली, लक्ष्मीनगर, कल्याण (पूर्व) येथे आपल्या आईच्या घरी असण्याची शक्यता आहे. पोलीस आरोपीसह त्याच्या आईचा आणि अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेत आहेत.

संबंधित व्यक्ती किंवा मुलगी कोणास मिळून आल्यास अथवा त्यांच्याबाबत काहीही माहिती असल्यास तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे (देवगड पोलीस ठाणे) यांच्या ९०२२१२३८२७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!