अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) मंदिराचे अध्यक्ष श्री. महेशदादा इंगळे साहेब यांची कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

कांदे कुटुंबीयांकडून पाद्यपूजा आणि सत्कार सोहळा स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामींच्या नामघोषांत पार पडला…

स्वामी समर्थांचे अनुभव , कथन मार्गदर्शन आणि आशीर्वाद आशीर्वाद दिले..

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष श्री महेशदादा इंगळे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या कुडाळ – नाबरवाडी येथील ” स्वामी सदन ” या निवासस्थानी आवर्जून भेट दिली यावेळी सर्वप्रथम कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून त्यांची पाद्यपूजा करण्यात आली आणि त्यांचा स्वामी समर्थांची प्रतिमा ,शाल आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.. यावेळी अक्कलकोट येथील मंदिराचे चेअरमन मा‌. महेशदादा मालक इंगळे साहेब ,सचिव मा.आत्माराम घाटगे, विश्वस्त मा .महेश गोगी, चिरंजीव मा.प्रथमेश इंगळे , श्रीशैल गवंडी , ज्ञानेश्वर भोसले, देवगड हडपीठ मठाचे मा.नंदकुमार पेडणेकर ,यांच्या सह 100 हून अधिक भाविक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी इंगळे साहेब यांनी श्री .स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथन आणि मार्गदर्शन केले तसेच आशीर्वाद दिले. स्वामींच्या नामस्मरणात आणि जयघोषांत हा सोहळा पार पडला.यावेळी स्वामी भक्त सदानंद कांदे,सागर कांदे,अनिश सावंत , राजेश मांजरेकर , नितीन सोलकर , सचिन कुडतरकर , बापू सावंत ,मयूर कुडतरकर , जितू राणे , विलास रुद्रे , स्वरूप सावंत,सागर मठकर, प्रथमेश वर्दम , पप्पू शिरसाठ ,कौस्तुभ कुडतरकर, बनी तळवलकर ,शशांक पिंगुळकर ,अविनाश पाटील, अभय म्हापसेकर , सौ.वनिता जाधव , श्री.कुणकावळेकर यांच्या सह असंख्य स्वामीभक्त सहभागी झाले होते..

error: Content is protected !!