अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा संशय
सावंतवाडी : येथे राहणाऱ्या परप्रांतीय महिलेचा कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह आढळून आला आहे. अत्याचार करून तिचा खून केला असावा, असा कारवार पोलिसांचा संशय असून त्यानुसार अधिक तपासासाठी तेथील पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आहे. ही घटना २२ तारखेला घडली आहे. दरम्यान खुन व अधिक माहितीच्या शोधात पोलिस सावंतवाडीत दाखल झाले आहे. पर्णकुटी विश्रामगृहासमोर असलेल्या घरात संबंधित महिला राहत होती. त्यामुळे काही क्लू मिळतो का? याचा शोध पोलीस घेत आहे. शारदाबाई राजू डिसोजा (वय ५०) असे तिचे नाव आहे. ती मूळची केरळ येथील आहे. या ठिकाणी ती आपल्या पतीसह राहून भीक मागून आपला चरितार्थ चालवत असे, मात्र दोन-तीन महिन्यापूर्वी तिचा पती गायब झाला होता. त्यानंतर ती एकटीच राहत होती. मात्र काही दिवसांपुर्वी ती सुद्धा या ठिकाणावरून निघून गेली होती.
२२ तारखेला कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला असावा, असा तेथील पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर तिच्या मोबाईल मध्ये सावंतवाडी शहरातील तिघा तरुणांचे नंबर मिळाले आहेत. त्या माध्यमातून अधिक तपास करण्यासाठी तेथील पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.


Subscribe





