कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन चा_ वार्षिक स्नेह मेळावा रविवार दिनांक जानेवारी २०२५ रोजी भवानी मंगल कार्यालय काळे पाणी येथे उत्साहात संपन्न झाला. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वार्षिक स्नेहा मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनमा.श्री वीरसिंग वसावे (तहसीलदार कुडाळ)तर प्रमुख पाहुणे म्हणूनराजेंद्र मगदूम(पी. आय पोलीस ठाणे कुडाळ) लाभले.
या स्नेह मेळाव्यात कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन अँड रीचर्स फाउंडेशनच्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या सर्व सभासदांना योग्य ते मार्गदर्शन दिले. या स्नेहमेळामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्टॉल सहभागी झाले होते. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तेंडोलकर सेक्रेटरी गुरुनाथ धुरी यांनी सर्व मान्यवरांचे स्नेह मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.