ग्लोबल फाउंडेशन ची माड्याचीवाडी विद्यालयातील चार विद्यार्थांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी मार्फत दरवर्षी गरीब व हुशार विद्यार्थांना शिष्यवृत्ती दिली जाते या वर्षी माध्यमिक विद्यालयातील कुमार. साहिल सुहास राऊळ दहावी, कुमारी.मंदिरा नारायण परब दहावी,कुमार गौरेश नारायण बाईत नववी व बुधाजी सुरेश गावडे नववी या चार विद्यार्थांना प्रत्येकी ३६०० प्रमाणे ज्ञानज्योती शिष्यवृत्ती मिळाली.

ग्लोबल फौंडेशन सिंधुदुर्ग जिल्ह्या मधील वेगवेगळ्या शाळामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच मोफत संगणक मार्गदर्शन शिबीर व वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम आयोजित करत असतात. गरीब व होतकरू मुलांना थोडाफार आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने दरवर्षी या फाउंडेशन मार्फत दरवर्षी ज्ञानज्योती शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी सिंधुदुर्गातील जवळजवळ १५० गरीब व होतकरू विद्यार्थांना हि शिष्यवृत्ती दिली गेली.

ज्ञानज्योती शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री प्रसाद परब, श्री. गुरु देसाई. श्री. समीर जोशी , श्री. गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्लोबल फाउंडेशन चे एस.के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अनंत सामंत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!