कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आज झंझावाती प्रचार दौरा करीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
पावशी जि.प.उमेदवार दादा साईल तसेच डिगस पं.स.चे उमेदवार निखील कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी आमदार निलेश राणे यांनी डिगस येथे प्रचार दौरा केला. यावेळी आमदार निलेश राणे यांची काॅर्नर सभा झाली. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. सर्वानी महायुतीच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, अरूण सावंत, कुडाळचे प्रचार प्रमुख काका कुडाळकर, अरविंद करलकर, दादा साईल, निखिल कांदळगावकर, माजी सरपंच नित्यानंद कांदळगावकर व रमेश घोगळे, अरूण सावंत, बाळा घाडी, धोंडी सुर्वे, शेखर गोसावी, लक्ष्मण पवार, नंदकिशोर पवार, श्रीधर परब, विजय लुडबे, अमर घाडी, सुरेश तानीवडे, विनायक अणावकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Subscribe










