नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उबाठा) पक्ष पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रूपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रूपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला. त्यानंतर नेरूर चव्हाटा येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले,या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विजय लाड जि.प. मतदारसंघात निवडणूकीला उभे राहीले होते. पंचायत समितीला आमचे दोन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र नेरूर भागातील ग्रामस्थांनी एक विनंती केली तसेच सर्वांनी ठरवले कि रूपेश पावसकर यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता निवडून आणावे. त्याला ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी होकार दिला. त्यामुळे लाड यांनी उमेदवार मागे घेतली आहे. ठाकरे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून रूपेश पावसकर या ठिकाणी उभे आहेत. आणि अर्चना बंगे व दिप्ती नाईक या दोन्ही पं.स. उमेदवार ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या आहेत. पावसकर यांना या भागातील सर्वांनी पाठिंबा दिला असून, आमचाही त्यांना पाठिंबा आहे.
रूपेश पावसकर म्हणाले, आपल्याला या मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांचा पाठींबा असून, ठाकरे शिवसेनेनेही पाठींबा दिला आहे. त्यामुळे आपण लढणार आणि जिंकणारही. प्रचार शुभारंभप्रसंगी अतुल बंगे, शेखर गावडे, कुणाल किनळेकर, राजन खोबरेकर, प्रदीप नाईक, विजय लाड, दाजी गावडे, मंजू फडके, रूपेश वाडयेकर, शामा परब, सुशील चिंदरकर, प्रसाद गावडे आदींसह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Subscribe









