२३ वर्षीय अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू

शुटिंगसाठी जाताना काळाचा घाला

मुंबई : ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अमन जयस्वाल याचं आज अपघातात निधन झालं आहे. बाईकवरून शूटिंगसाठी जात असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. अमन जयस्वाल हा बलिया, उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. आपल्या कठोर परिश्रमाने त्याने हे स्वप्न साकार केले. मात्र अवघ्या २३ व्या वर्षी त्याचं अपघाती निधन झालं. अमनच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अमनला सुरुवातीपासूनच अभिनेता बनायचं होतं. तथापि, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, अभियंता किंवा डॉक्टर व्हावे. त्याच्या वडिलांची इच्छा होती की अमनने अभिनेता बनू नये. मात्र त्याच्या आईने अमनला पाठिंबा दिला आणि त्याच्या वडिलांनाही ही बाब समजावून सांगितली. अमन अनेकदा त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला देत असे. तथापि, आता अमनने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.

अमन जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बलिया येथील होता. अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने मोठ्या मेहनतीने अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र, वयाच्या २३ व्या वर्षी त्याचा रस्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. अमनने अवघ्या २३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याने २०२३ साली टीव्ही चॅनल ‘धरतीपुत्र नंदिनी’ शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. या शोमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली होती. याआधी त्याने ‘उडारिया’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऑडिशनसाठी शुटिंगला जाताना त्याचा अपघाती मृत्यू झाला.

error: Content is protected !!