ब्युरो न्यूज: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून हे अधिवेशन ३१ जानेवारी पासून चालू होणार आहे.३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी असा अर्थ संकल्पित अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थ संकल्प सादर करणार असून मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पाहिलं पूर्ण अर्थसंकल्पीय बजेट असणार आहे.दरम्यान सर्वसामान्य जनतेचे लक्ष ह्या अर्थसंकल्पावर असणार आहे.काय स्वस्त काय महाग याचे पेच सुटणार असून मुख्य म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हाप्त्यामधे त्यांचं घरगुती बजेट कोलमडणार की सावरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.