कुडाळ : दिवाळीच्या मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावची कन्या महिका आनंद मराठे हिने सिंधुदुर्ग किल्याची प्रतिकृती साकारली आहे. याबद्दल शिवप्रेमींनी तिचे कौतुक करत तिला सन्मानपत्र प्रदान केले.
सध्याच्या युगात मुलांना मोबाईलचे अक्षरशः व्यसन लागले आहे. अशातच मुलांना आपल्या संस्कृतीचा, छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास कळण्याची गरज आहे. यावेळी कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावची कन्या महिका आनंद मराठे हिने दिवाळीत मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. शिवप्रेमी संघटनेने तिच्या या कार्याचे कौतुक करत सन्मानपत्र प्रदान केले.