दिनांक 16/11/2025( रविवार) रोजी जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी ( रायवाडी)ता. कुडाळ येथे जिव्हाळा सेवाश्रमाच्या सभागृहात प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को. ऑप. सोसायटी मर्यादित- सिंधुदुर्गच्या वतीने शोभिवंत मत्स्य उत्पादन याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. सदर मार्गदर्शन शिबिरास को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष श्री सुहास सावंत तसेच सोसायटीचे सचिव व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर कार्यशाळेत शोभिवंत माशांचे, संगोपन, हाताळणी, तसेच त्यांना पुरविणेचे खाद्य तसेच त्यांना पुरविण्यात येणारा ऑक्सिजन याबाबत मार्गदर्शन करणेत आले.
जिव्हाळा सेवाश्रमाचा हॉल उपलब्ध करून दिल्या बाबत को. ऑप. सोसायटी अध्यक्ष तसेच श्री अभिमन्यू गावडे यांनी जिव्हाळा सेवाश्रमाचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात जिव्हाळा सेवाश्रमाचे श्री बाबा गावडे, श्री संजय बिर्जे, श्री संदीप बिर्जे, कु. गीतांजली बिर्जे, सौ. प्राजक्ता केळूसकर, श्री. जयप्रकाश प्रभू, सौ. पूनम बिर्जे, सौ. दिपाली पाटकर, सौ. सुलोचना बिर्जे, सौ. शोभा बिर्जे यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम संपन्न केला.तसेच त्यांना स्नेहभोजन व चहा इत्यादी देऊन त्यांचे आदरातिथ्य करणेत आले.


Subscribe







