कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण पूर्ण

कुडाळ : “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत “अ” वर्ग बसस्थानक यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. बसस्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी समितीमार्फत करण्यात आली. कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक यांनी समितीचे स्वागत केले.
एसटी महामंडळाच्या प्रादेशिक नियंत्रण समिती क्र. 6 नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने व नागपूर विभागाचे प्रादेशिक वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने बस स्थानकातील इमारत, सेवा सुविधा, स्वच्छतेसह विविध व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणांकन केले.’अ’ वर्गातील बस स्थानकांचे सर्वेक्षण प्रादेशिक उपमहाव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केले जाते. राज्य परिवहन महामंडळामार्फत संपूर्ण राज्यभरात स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविले जात आहे. हे अभियान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबविले जात आहे. सदर अभियान एप्रिल 2025 ते मार्च 2026 अखेर पर्यंत राबविण्यात येत. तीन महिन्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्थानकांचे सर्वेक्षण केले जाते. या अभियानांतर्गत राज्यातील बसस्थानकांची स्वच्छता, साफसफाई, स्वच्छतागृहे आणि कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची पाहणी करून त्यांना गुणांकन दिले जाते. त्यानुसार कुडाळ आगाराच्या बसस्थानकातील विविध व्यवस्थापनाचे निरीक्षण करून गुणांकन करण्यात आले. प्रादेशिक नियंत्रण समितीचे उपमहाव्यवस्थापक श्री. गभने यांच्या नेतृत्वाखाली पाहणीसाठी आलेल्या समितीमध्ये वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने, पत्रकार संजय तेंडोलकर व प्रवाशी मित्र सौरभ पाटकर यांचा समावेश होता. कुडाळ आगाराचे आगारप्रमुख रोहित नाईक, वाहतूक नियंत्रक एम. एन.आंबेस्कर, पत्रकार काशीराम गायकवाड, गुरु वालावलकर, एन डी. धुरी, रमाकांत ठाकूर, संजय पोळ, श्री धुरी, श्री तांबे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!