कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र या घटनेची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.