वेताळ बांबर्डे वाघभाटलेवाडी – वाघोबा मंदिर येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे वेताळ बांबर्डे वाघभाटलेवाडी – वाघोबा मंदिर येथे मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजूबाजूच्या ५ वाडीतील महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.

हा कार्यक्रम पूर्णतः महिलांनीच आयोजित केला होता. तसेच या कार्यक्रमाचे व्यवस्थापन देखील महिलांनीच केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजूबाजूच्या वाडीतील महिला एकत्र जमल्या आणि त्यांच्यामध्ये विचारमंथन झाले. खरंतर आज महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. काही क्षेत्रात तर या महिला पुरुषांपेक्षा अग्रेसर आहेत. सततच्या कामातून गावातील महिलांना एक विरंगुळा मिळवा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. भविष्यात संपूर्ण गावातील महिलांसाठी हळदी – कुंकवाचा भव्यदिव्य कार्यक्रम करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले. यामध्ये सुगंधाताई तिरोडकर, नारायण गावडे, प्रकाश पालव, श्रीधर गावडे, अशोक डांगे, दिलीप गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!