मुंबई: बहुचर्चित आणि निकालासाठी बहुप्रतिक्षित असलेले प्रकरण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा.या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराडला थोड्याच वेळात पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराडची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रुग्णालयात त्याची ईसीजी देखील करण्यात आली. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वाल्मिक कराडला पुन्हा बीड कारागृहात नेण्यात आले.
वाल्मीक कराडच्या प्रश्नांमुळे नवा ट्विस्ट
दरम्यान रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती. तसेच पोलीस आणि माध्यमांचा गराडा देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयाबाहेर होता. यावेळी वाल्मिक कराड रुग्णालयाबाहेर येताच रोहित कुठंय?, असा प्रश्न केला. साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठेय, असं वाल्मिक कराडने विचारले. त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण आहे?, याची चर्चा सध्या रंगली आहे.
वाल्मीक कराडची संपत्ती कुठे कुठे आहे?
वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीतही फ्लॅट असल्याचं समोर-पुण्यानंतर वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय. वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमतीचा आहे. सध्या इथं कोणी राहत नाहीये, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.













