ठाकरेंना शिवसेनेचा पाठिंबा?; मुख्यमंत्री आग्रही मात्र…

एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करू नये

सदा सरवणकरांची अमित ठाकरेंवर बोचरी टीका

ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुकीत माहीम मधून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात चुरशीची लढत द्यायला शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि उबाठा चे उमेदवार महेश सावंत यांनी अर्ज केला आहे. दरम्यान महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रही आहेत.मात्र सदा सरवणकर आपल्या मतावर ठाम आहेत.माझा माझ्या जनतेवर विश्वास आहे मी एकटा पडलेलो नाही आहे,मला माझी जनता जिंकून देणार असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.दरम्यान यावरून शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा दिसून आली आहे.

विशाल परब यांच्या स्टंटबाजीला सांवतवाडीची जनता बळी पडणार नाही

अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्यात भाजपचं सरकार सत्तेत येईल, मुख्यमंत्री जो होईल तो मनसे आणि भाजपच्या मदतीने होईल असं भाष्य केले होते. त्यावर सदा सरवणकर म्हणाले, “अशी वैयक्तिक मतं असतात, पण ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हे किती हास्यास्पद आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करावी असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण हे पुढे महायुती ठरवेल. मला एवढंच कळतं, मी या मतदार संघातून उभा राहणार आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आणि मी निवडून येणार आहे. लोकांचा मला आशीर्वाद आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *