कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळणार – सुधीर मुनगंटीवार

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून हटवण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केले आहे. ‘ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला ते एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे. ते सरकार पडणार लिहून घ्या’, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!