कुडाळ : फेरीवाले आपले वाहन घेऊन अगदी स्वस्त दरात बाहेरून फळे आणून आपल्या कुडाळ तालुक्यात ग्रामीण भागात फळे विक्री करण्यासाठी काही प्रमाणात अशा गाड्या वस्ती वस्ती मध्ये फिरत आहे. परंतु आजची सत्य परिस्थिती उबाठा पिंगुळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली. पिंगुळी नवीवाडी येथे फळ विक्री साठी वाहनातून अगदी कमी दरामध्ये फळ विक्री सुरू होती. परंतु काही ग्राहकांच्या निदर्शनात आले. या फळांमध्ये कीटक आणि अळ्या आढळून आल्या ग्रामस्थांनी तात्काळ दीपक गावडे यांच्याशी संपर्क साधून. तत्पर हजर होऊन गाडीमध्ये असलेल्या फळांची तपासणी केली असता. बहुसंख्य फळांमध्ये कीटक आणि आढळून आल्या. अशी वाहतूक करून स्वस्त दरामध्ये फळ विकणाऱ्यांना या अगोदर दीपक गावडे यांनी चांगल्या दर्जाची फळे विक्री करा अशा सूचना देऊन सुद्धा. असे फळ विक्रेते सर्रास ग्रामीण भागामध्ये ग्राहकांच्या जीवितास हानी होण्यासारखे फळे विक्री करत आहेत. बाहेरून येणाऱ्या फळ विक्रेत्यांकडून ग्रामस्थांनी अशा स्वस्त दराच्या फळांच्या आमिषाला बळी न पडता. आपण आपला जीव धोक्यात न टाकता अशा फळ विक्रेत्यांकडून फळे खरेदी करू नका. असे नागरिकांना उबाठा शिवसेना गटाचे दीपक गावडे यांनी आवाहन केले. या घटने दरम्यान पिंगुळी पोलीस पाटील सतीश माडये, पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर तात्काळ हजर होऊन त्या ठिकाणची वस्तुस्थिती लक्षात घेता. त्या बाहेरून येणाऱ्या फळ विक्रेत्यांवरती कार्यवाही करा असे सूचना पोलीसाना देण्यात आले. आहेत. त्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये फळ विक्री करणारी गाडी हजर केल्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मगदूम साहेब यांनी फळांची तपासणी केली असता. त्या वाहतूक करणाऱ्या फळ विक्रेत्या वरती योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेना गटाचे विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, दीपक गावडे, बाबल गावडे, अभिषेक गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.