अल्लू अर्जुन शक्तीमानच्या भूमिकेसाठी योग्य:मुकेश खन्ना
मुंबई प्रतिनिधी: नव्वदीच्या काळातील लहान मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले.या शक्तिमानला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न यश राज फिल्म कडून करण्यात येत आहे. पण अभिनेता मुकेश खन्ना त्यासाठी हक्क द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.
यशराज फिल्म कडून रणवीर सिंग चे नाव
दरम्यान ‘पुष्पा २’ स्टार अल्लू अर्जुन शक्तीमानच्या भूमिकेसाठी सर्वात योग्य आहे असे मुकेश खन्ना यांनी सुचवले तेव्हा ते प्रकाशझोतात आले. त्याने असेही सांगितले की काही वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या टीमने त्याच्याशी संपर्क साधला होता आणि शक्तीमानचे हक्क विकत घ्यायचे होते, परंतु त्याने ही ऑफर नाकारली. यावेळी यश राज फिल्म मुकेश खन्नाच्या ऐवजी शक्तीमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग विचार करत होते मात्र त्यांना ही कास्टिंग आवडली नसल्याचे देखील त्यांनी काबुल केले.
शक्तिमान दुसऱ्या कलाकारांसोबत बनवण्यास देणार नाही
एका मुलाखती दरम्यान मुकेश खन्ना म्हणाले, ‘दहा वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या टीमने मला संपर्क केला होता. त्याने मला विचारले की मी त्याला शक्तीमानचे हक्क देऊ शकतो का?’ त्याने पुढे सांगितले की योगायोगाने रणवीर सिंगच्या चाहत्याने शक्तीमानचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि नंतर अचानक त्याला हक्कांसाठी कॉल आला. मुकेशने हक्क देण्यास नकार दिला. ते म्हणाले की ते हक्क द्यायचे नाहीत कारण त्यांच्यामते आदित्य चोप्रा शक्तिमान नीट सादर करू शकणार नाहीत.मुकेश खन्ना पुढे म्हणाले, ‘मी त्याला म्हणालो- आदित्यला सांग की तुला शक्तिमान पुन्हा बनवायचा असेल तर माझ्यासोबत बनव.’ पण मी तुला शक्तिमान कोणा दुसऱ्या कलाकारांसोबत बनवण्याचे अधिकार देणार नाही. मी नकार दिला.दरम्यान, मुकेश खन्ना म्हणाले की अल्लू अर्जुन शक्तीमानच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे त्यांनी सुचवले होते.














 
	

 Subscribe
Subscribe









