पिंगुळी ग्रामपंचायतीला मिळाले सुरक्षा साहित्य

तलाठी जितेंद्र खेताडे यांच्या पुढाकारातून लाइफ जॅकेट व ट्यूब उपलब्ध

पिंगुळी : गणपती विसर्जनासह आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी पिंगुळी ग्रामपंचायतीला लाइफ जॅकेट आणि लाइफ सेव्हिंग ट्यूब उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंगुळी गावाचे नवनिर्वाचित तलाठी मा. श्री. जितेंद्र खेताडे यांनी पुढाकार घेत तहसीलदार कार्यालयाकडून हे सुरक्षा साहित्य ग्रामपंचायतीसाठी मिळवून दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलाव, नदी किंवा जलाशयांमध्ये विसर्जनावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने हे साहित्य अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीतही त्याचा उपयोग करता येणार आहे.

यावेळी सदर लाइफ जॅकेट व ट्यूब ग्रामपंचायत कर्मचारी सचिन गावडे, संदेश गावडे, भरत धुरी आणि निश्चय मसके यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिल्याबद्दल तलाठी जितेंद्र खेताडे यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!