
युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश दिनेश कांबळी यांचा टोला
माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आमच्या नेतृत्वावर केलेले आरोप हे पूर्णपणे हास्यास्पद आणि राजकीय वैफल्यातून आलेले आहेत, असा घणाघाती पलटवार युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश दिनेश कांबळी यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
- जनतेने नाकारले: कुडाळ-मालवणच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतच वैभव नाईक यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पराभवाच्या धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत, म्हणूनच ते केवळ प्रसिद्धीसाठी नवनवीन स्टंट करत आहेत.
- पक्षांतराचा पोकळ दावा: स्वतः दुसरीकडे जाण्यासाठी चाचपणी करणारे आणि सत्तेसाठी लाचार होणारे आज आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत. जनतेचा विकास करण्याऐवजी फक्त राजकारण करणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा उरला आहे.
- विकासाच्या मुद्द्यावर मौन: महायुती सरकार आणि आमचे स्थानिक नेतृत्व कोकणात कोट्यवधी रुपयांचे विकासप्रकल्प आणत असताना, वैभव नाईक मात्र त्यात खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांनी स्वतःच्या कार्यकाळात काय दिवे लावले, याचे आत्मपरीक्षण आधी करावे.
- युवाशक्ती उत्तर देईल: युवासेना आणि मतदारसंघातील सुजाण तरुण वैभव नाईक यांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. आगामी काळात त्यांच्या प्रत्येक आरोपाला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही कांबळी यांनी दिला आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









