कै. ज. तु. दळवी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

कळसुली : दि. २५ जुलै, २०२६ रोजी कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. ज. तु. दळवी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या अतुलनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्त प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गटवार वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी श्री. के. आर. दळवी (स्कूल कमिटी चेअरमन) हे होते व प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. प्रकाश दळवी (सल्लागार, कळसुली शिक्षण संघ, मुंबई), श्री. प्रदीप सावंत (उद्योजक), मुख्याध्यापक श्री. वगरे व्ही. व्ही., श्री. अनिल सावंत (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), ज्येष्ठ शिक्षक श्री. सावळे एस. के. तसेच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सल्लागार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश दळवी यांनी कै. ज. तु. दळवी यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांना उजाळा दिला. त्यांचा विलक्षण उत्साह, कार्यतत्परता, निष्ठा आणि धडाडी यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण आत्मसात करून स्वतःही आदर्श नागरिक बनावे असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री. वगरे व्ही. व्ही. यांनी कै. ज. तु. दळवी यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. त्यांची अथक परिश्रम करण्याची वृत्ती, दूरदृष्टी आणि समाजसेवेच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. के. आर. दळवी यांनी कै. ज. तु. दळवी यांच्या जीवनप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी सहकाऱ्यांच्या साथीने कळसुली इंग्लिश स्कूलची स्थापना केली याचा गौरव त्यांनी केला. “आदर्श व्यक्तिमत्त्वे ही पुस्तकांमध्येच नसतात; तर ती आपल्या समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्येही ती सापडतात,” असे सांगत विद्यार्थ्यांनी कै. ज. तु. दळवी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत दळवी, कार्याध्यक्ष श्री. विजय सावंत, सचिव श्री. जय दळवी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी कै. ज. तु. दळवी यांना भावपूर्ण अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित कै. ज. तु. दळवी वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचा निकाल

प्राथमिक गट
🥇 प्रथम : कुमार साईराज मोती वरक
🥈 द्वितीय : कुमार सिद्धेश नंदन गावकर
🥉 तृतीय : कुमारी पूर्वी अजय कदम (जि. प. प्राथमिक शाळा दिंडवणे )
माध्यमिक गट
🥇 प्रथम : कुमारी श्रावणी संतोष राणे
🥈 द्वितीय : कुमारी आयुषी आत्माराम सावंत
🥉 तृतीय : कुमारी रिया राहुल कासले
उच्च माध्यमिक गट
🥇 प्रथम : कुमारी सानिका सुधीर गावडे
🥈 द्वितीय : कुमारी प्रांजल सुनील परब
🥉 तृतीय : कुमारी सृष्टी सुनील दळवी

यशस्वी विद्यार्थ्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांनी मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.आनंद सावंत यांनी केले.

error: Content is protected !!