हुमरमळा (वालावल) बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड!

वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय – सौ अर्चना बंगे

कुडाळ : हुमरमळा वालावल बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड पडल्याने वाहातुक बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने पहाणी करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे.
हुमरमळा वालावल बिजोळेवाडी ते करमळीवाडी गावधड वाडी ते आरकाचे पुल वालावल असा रस्ता आहे. परंतु, बिजोळेवाडी पुल बांधुन बरीच वर्षे झाली असून या पुलाला मोठे खड्डे पडले आहेत. तसेच सर्व पाईप फुटले आहेत असे सांगुन सौ. बंगे यांनी म्हटले. तसेच सध्या ग्रामस्थांना जाण्या येण्याची कसरत करावी लागते. शिवाय चारचाकी गाड्या व रिक्षा या मार्गावरून जाऊ शकत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. या कामाची त्वरित पहाणी सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) यांच्या अधिका-यांनी पहाणी करुन त्वरित कारवाई करावी अशी मागणी सौ बंगे यांनी केली आहे.

error: Content is protected !!