कळसुलीतील ५६ पात्र शेतकऱ्यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्ती; २७ लाखांची रक्कम खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री नाम. नितेशजी राणे यांचे सरपंच सचिन पारधिये यांनी मानले आभार

कणकवली : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कळसुली गावातील एकूण ५६ पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मंजूर झाली असून, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण २७ लाखांची कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कर्जमुक्तीबाबत गावाचे सरपंच श्री. सचिन पारधिये यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नाम. श्री. नितेशजी राणे यांचे आभार व्यक्त केले. शासनाच्या या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार असून शेतीसाठी नव्याने उभारी घेण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण (KYC) पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सरपंच श्री. पारधिये यांनी सांगितले. सर्व पात्र लाभार्थींनी शासनाच्या अधिकृत अॅपद्वारे किंवा आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कळसुली येथे जाऊन लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सरपंच सचिन पारधिये यांनी केले आहे.

error: Content is protected !!