कुडाळ येथील महिलेची राहत्या घरी आत्महत्या

सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

कुडाळ : शहरातील सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून गळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार श्री. संजय विष्णू कुडाळकर वय वर्षे ५१ गणेश नगर कुडाळ, यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात केली आहे. सौ. तन्वी कुडाळकर हिला दोन मुलगे, पती श्री. सिद्धिविनायक कुडाळकर, एक दीर, भावजई असा परिवार आहे. सौ. तन्वी हिने आत्महत्या केल्याची समजताच गणेशनगर सह कुडाळ शहरात नागरिकांकडुन हळवल वेक्त केला जात आहे.

आत्महत्या झाल्याची खबर मिळताच त्वरित सकाळी ९.१५ वाजता कुडाळ पोलीस घटनास्थळी आले असता घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमची कडी आतील बाजूने उघडलेली होती. तन्वी ची आत्महत्या राहत्या घरी रविवारी २६जुलै रात्रौ ११ ते, सोमवार २७जुलै सकाळी ८ वाजेपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिसांनी वेक्त केला जात आहे. काल रविवारी सौ. तन्वी कुडाळकर ही तिचे पती श्री. सिद्धिविनायक कुडाळकर यांच्या सोबत कासारटका देवस्थान येथे स्नेहभोजना साठी गेली होती त्या नंतर स्नेहभोजन झाल्यानंतर सायंकाळी परत घरी देखील आली होती. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री. अवताडे साहेब करत आहेत.

error: Content is protected !!